पुण्यात फिर्यादी महिलेलाच ‘थर्ड डिग्री’, पोलिसांवर गुन्हा दाखल

 पुण्यात फिर्यादी महिलेलाच ‘थर्ड डिग्री’,  पोलिसांवर गुन्हा दाखल

पुणे, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यामधुन गेल्या काही महिन्यांपासून अनेक प्रकारच्या गंभीर गुन्ह्याच्या घटना उघडकीस येत आहेत. या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस यंत्रणा सुसज्ज असून गुन्हेगारांना योग्य शासन करण्यासाठी तत्पर असल्याचेही दिसत आहे. मात्र एका प्रकरणामध्ये पुणे पोलीसांनी एका फिर्यांदी महिलाच ‘थर्ड डीग्री’ लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर या प्रकरणी पोलीसांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे ही घटना 23 मार्च 2023 मधील आहे, मात्र पोलिसांवर आत्ता गुन्हा दाखल झाला आहे. इतके दिवस पोलिसांवर कोणाचा दबाव होता? गुन्हा आताच कसा दाखल झाला असे अनेक सवाल या प्रकरणी उपस्थित होत आहेत.

प्रकरणाची पार्श्वभूमी

पुण्यामध्ये हडपसर भागात 25 वर्षीय पीडीत महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याची फिर्याद दिली होती. पीडितेने तिचा पती अक्षय आवटे याच्यासह त्याच्या दोन मित्रांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या ठाण्यामधील एका महिला पोलिसने फिर्यादीला बोलावून घेतलं. त्यानंतर फिर्यादी पोलीस ठाण्यात गेल्या. चौकशीसाठी गेलेल्या फिर्यादीला पोलीस निरीक्षक रमेश साहेबराव साठे यांनी ‘हिला आतमध्ये घ्या’, असं सांगितलं. त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी फिर्यादी महिलेला एका खोलीत नेले. महिला पोलीस हवालदार माया गाडेकर, योगिता आफळे आणि इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी फिर्यादी महिलेला थर्ड डिग्री दिली. फिर्यादीचं म्हणणंस ऐकून न घेता तिला कंबरेच्या पट्ट्याने आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. अक्षय आवटे, आदित्य गौतम आणि सुजित पुजारी ही एका राजकीय पुढाऱ्याची माणसं आहेत. तुला ते जिवंत मारतील असंही तिला सांगण्यात आलं.

फिर्यादी महिलेने १३ जून गुरुवारी याबाबत फिर्याद दिली आहे. या प्रकरणात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अर्जुन सदाशिव दिवेकर (वय-50), महिला पोलीस हवालदार निलम सचिन कर्पे, माया तुकाराम गाडेकर, योगिता भानुदास आफळे, एक अनोळखी महिला पोलीस शिपाई, अनोळखी पुरूष पोलीस कर्मचारी, अक्षय जीवन आवटे , आदित्य गौतम, सुजित पुजारी यांच्यावर आयपीसी 354, 354(ब), 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ML/ML/SL

15 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *