सोलापूर विद्यापीठाला पब्लिक रिलेशन कौन्सिलचा पुरस्कार
सोलापूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाला पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेतर्फे राष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्ट कम्युनिकेशन स्कूल ऑफ द इयर’ हा चाणक्य ज्युरी विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.Public Relations Council Award to Solapur University
या पुरस्कारामुळे विद्यापीठाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. Due to this award, the university has been recognized at the national level. पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी देशातील एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. या संस्थेने कोलकाता येथे हॉटेल फेअरफिल्ड मॅरिएट येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते.
हा पुरस्कार विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ .जी .एस .कांबळे आणि मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर यांनी स्वीकारला. पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाचे संस्थापक एम .बी . जयराम आणि इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ML/KA/PGB
13 Nov .2022