साडे तीन लाख कोटींचे मोबाईल फोनचे उत्पादन भारतात लवकरच
पुणे, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोबाईल फोनसाठी उत्पादन सोपे व्हावे म्हणून लिंक्ड प्रोत्साहन योजना (PLI) च्या यशावर आधारित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 17 मे 2023 रोजी IT हार्डवेअरसाठी PLI योजनेला मंजुरी दिली आहे अशी माहिती तंत्रविज्ञान खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
आज यासाठी 27 IT हार्डवेअर उत्पादकांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. Acer, Asus, Dell, HP, Lenovo इत्यादी सुप्रसिद्ध ब्रँड्सचे IT हार्डवेअर यातून भारतात तयार केले जातील. यासाठी योजनेच्या कालावधीत सुमारे 02 लाख रोजगार निर्मिती होईल त्यातील 50,000 (प्रत्यक्ष) आणि सुमारे 1.5 लाख (अप्रत्यक्ष) स्वरूपात असतील.
या आईटी हार्डवेयर धोरणामुळे होणारे उत्पादन मूल्य 3 लाख 50 हजार कोटी रुपये (42 बिलियन अमेरिकी डॉलर) इतके असेल. यात सहभागी कंपन्यांची गुंतवणूक
3,000 कोटी रुपये असेल.
आज पुण्यात उद्योग जगतातील मान्यवर आणि प्रसार माध्यमांसमोर बोलताना अश्विनी वैष्णव नयांनी ही माहिती दिली.
या मोबाईल फोन उत्पादनासाठी 27 कंपन्यांनी अर्ज केले असून त्यातील 23 जन आजच निर्मितीसाठी सज्ज आहेत असेही वैष्णव म्हणाले. Production of three and a half lakh crore mobile phones in India soon
ML/KA/PGB
18 Nov 2023