प्लास्टिकचे जॅकेट परिधान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पेहरावांवरुन कायमच चर्चेत असतात. १५ ऑगस्ट असो २६ जानेवारी अथवा सभा, मोदी आपल्या खास पेहेरावाने कायमच असतात. प्रत्येक पेहेरावामागे काहीतरी खास कारण असते.असेच काहीसे आता पुन्हा एकदा घडले आहे.
यावेळी ते त्यांच्या खास जॅकेटमुळं चर्चेत आले आहेत. या जॅकेटच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाबाबतचा महत्वाचा संदेश दिला आहे. थेट संसदेत येताना हे युनिक जॅकेट परिधान करुन मोदींनी हजेरी लावली.Prime Minister Narendra Modi in Rajya Sabha wearing a plastic jacket
मोदींच्या जॅकेटची खासियत अशी आहे की; प्लास्टिकचा पुनर्वापर करुन तयार केलेलं हे जॅकेट आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शाश्वत विकास आणि रिसायकल केलेल्या वस्तू वापरण्याचा त्यांनी यातून मोठा संदेश दिला आहे. बुधवार,दि. ८ जानेवारी रोजी हे आकाशी निळ्या रंगाचे जॅकेट परिधान करुन मोदी राज्यसभेत दाखल झाले.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी यापूर्वी इंडियन ऑईलच्या ‘अनबॉटल्ड’ मोहिमेंतर्गत सोमवारी बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या भारत ऊर्जा सप्ताह २०२३ मध्ये प्लास्टिकपासून बनवलेल्या गणवेशाच्या एका स्टॉलचं उद्घाटन केलं होतं. याच्या आयोजनादरम्यान मोदींनी हरित विकास,ऊर्जा संक्रमण यासाठी भारताच्या प्रयत्नांना भारतीय मुल्यांशी जोडले होते. जे भारतीय अर्थव्यवस्था आणि प्रत्येक भारतीयाच्या जीवनशैलीचा भाग असल्याचे म्हटले होते.
मोदी या कार्यक्रमात म्हणाले होते की, आपण प्लास्टिकच्या टाकाऊ बाटल्या रिसायकल करुन तयार करण्यात आलेला गणवेश पाहिलात का? फॅशन आणि ब्युटीच्या जगात तर हा गणवेश कुठेही कमी पडत नाही. प्रत्येक वर्षी असा १०० मिलियन बाटल्यांचा पुनर्वापर करण्याचं लक्ष्य भारतानं ठेवलं आहे. मिशन लाईफला हा प्रयोग अधिक मजबूत करेन असंही मोदींनी यावेळी म्हटलं होतं.
ML/KA/PGB
8 Feb. 2023