उद्या पंतप्रधान मुंबईत , अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण..

 उद्या पंतप्रधान मुंबईत , अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण..

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या मुंबई भेटीवर असून त्यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात येणार आहे.

वांद्रे – कुर्ला संकुल परिसरातील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मैदानात गुरुवारी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात येणा-या कार्यक्रमादरम्यान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेतील २० नवीन दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ७ मलजल प्रक्रिया केंद्रांचे भूमिपूजन, महानगरपालिकेच्या ३ रुग्णालयांच्या इमारतींचे भूमिपूजन आणि महानगरपालिकेच्या अखत्यारितील ४०० कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत १ लाखांहून अधिक फेरीवाल्यांना कर्ज वितरणाचा लाभ होणार आहे. या वितरणाचा शुभारंभ देखील पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

याशिवाय मेट्रो सात आणि मेट्रो दोन अ च्या विस्तारित मार्गांचे लोकार्पण देखील ते करतील आणि या मेट्रोतून ते प्रवासही करतील , त्यासाठी मेट्रो एक ची सेवा सायंकाळी दोन तास बंद ठेवण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मान्यवर लोकप्रतिनिधी, केंद्र व राज्य शासनासह बृहन्मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.Prime Minister in Mumbai tomorrow, Bhoomipujan and inauguration of many projects..

ML/KA/PGB
18 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *