प्रतिक जगताप आणि सरनोबत यांनी कुस्तीत आगेकूच

 प्रतिक जगताप आणि सरनोबत यांनी कुस्तीत आगेकूच

पुणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुणे जिल्ह्याच्या प्रतीक जगताप व उस्मानाबादच्या मुंतजिर सरनौबत यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी मल्लाना पराभूत करताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अस्थायी समितीच्या वतीने ६५ व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या ८६ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

कोथरूड येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत या स्पर्धेचे आयोजन भाजपचे राज्य संघटक व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये पुणे जिल्ह्याच्या प्रतीक जगतापने सोलापूरच्या एकनाथ बेंद्रेला ८-३ असे पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. दूसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये उस्मानाबादच्या मुंतजिर सरनौबतने सातारा जिल्ह्याच्या विजय डोईफोडेला ५-१ असे करताना अंतिम फेरी गाठली.

उपांत्यपूर्व फेरीत साताऱ्याच्या विजय डोईफोडेने पुणे शहरच्या ओंकार दगडेवर १३-२ अशी मात करताना उपांत्य फेरी गाठली. पुणे जिल्ह्याच्या प्रतीक जगतापने कल्याणच्या सोमनाथ भोईरवर ७-० अशी मात केली. उस्मानाबादच्या मुंतजिर सरनौबतने विशाल महातेकर ठाणे शहरला मात देताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. सोलापूरच्या एकनाथ बेंद्रेने कोल्हापूर जिल्ह्याच्या किरण पाटीलला ११-० असे पराभूत करताना उपांत्य फेरी गाठली.

तत्पूर्वी, स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात झालेल्या ८६ किलो वजनी गटात नांदेडच्या विजय पवारने उस्मानाबादच्या हर्षवर्धन लोटकेला थेट चितपट करताना स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. याच गटात सोलापूर जिल्ह्याच्या राहुल काळेने संभाजीनगरच्या (औरंगाबाद) मोईन शेखला चितपट केले. भंडारा जिल्ह्याच्या अर्जुन काळेने मुंबई शहरच्या दिनेश पवारला १०-३, मुंबई पश्चिमच्या रोहित मोढळेने पुणे जिल्ह्याच्या संतोष पडळकरवर १५-५ अशी मात करताना पुढील फेरी गाठली.

नाशिक जिल्ह्याच्या नितीन बेझेकरने रायगडच्या सचिन भोपीला ७-४ असे गुणांच्या साहाय्याने पराभूत केले. वाशीमच्या सचिन पाटीलने बीडच्या अनिकेत गोरेवार ४-१ अशी मात करताना स्पर्धेच्या पुढच्या फेरीत धडक दिली.Pratik Jagtap and Sarnobat will continue to wrestle

ML/KA/PGB
11 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *