हातकणंगले मतदारसंघातून प्रकाश आवाडे यांनी घेतली माघार.

कोल्हापूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुती समर्थक अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचे बंड थंड करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलं आहे , त्यांनी आज निवडणुकीतून माघार घेतली आहे.
निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आवाडे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा अर्ज भरण्यासाठी महायुतीच्या रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सहभागी झाले होते. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकाश आवडे यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी आवाडे यांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी आपली तलवार म्यान केली.
मुख्यमंत्र्यांसमवेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, रामदास कदम होते.
हातकणंगले मतदारसंघातील विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीला गेल्या महिनाभरापासून आवाडे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून उघड विरोध केला होता. आवाडे यांचे पुत्र आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी सुरुवातीला स्वतःच लोकसभा लढणार अशी घोषणा केली होती.Prakash Awade withdrew from Hatkanangle constituency.
ML/ML/PGB
15 Apr 2024