प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याचं प्रदर्शन

 प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याचं प्रदर्शन

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :संयुक्त  महाराष्ट्र लढ्यातील  अग्रणी, पत्रकार, थोर समाजसुधारक केशव सीताराम  ठाकरे उर्फ प्रबोधनकार  यांच्या ४९व्या स्मृतिदिनानिमित्त  दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागात त्यांच्या समग्र साहित्याचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. त्याचं उद्घघाटन ग्रथसंग्रहालयाचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांच्या हस्ते  आज करण्यात आलं.

या प्रदर्शनात  त्यांचं ‘वक्तृत्वशास्र हे पहिले पुस्तक तसेच’धर्मांची देवळे’, देवळांचा धर्म’, ‘हिंदू धर्माचे दिव्य’ तसेच इतर पुस्तकं ठेवण्यात आली आली असून साहित्य संस्कृती मंडळानं प्रकाशित केलेले ग्रंथही प्रदर्शनात आहेत. हे प्रदर्शन २६ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १०:०० ते संध्याकाळी ७:०० पर्यंत वाचकांना पाहता येईल.या प्रदर्शनाचा लाभ मोठ्या संख्येने  वाचक, अभ्यासकांनी  घ्यावा, असं आवाहन संस्थेचे प्रमुख कार्यवाह  रवींद्र  गावडे यांनी  केलं आहे.

ML/KA/PGB

20 Nov 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *