मुंबईत लवकरच होणार कचऱ्यापासून ‘वीज निर्मिती प्रकल्प’

 मुंबईत लवकरच होणार कचऱ्यापासून ‘वीज निर्मिती प्रकल्प’

मुंबई, दि. ३१ : मुंबई शहरसह पूर्व व पश्चिम उपनगरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने देवनार डम्पिंग ग्राऊंड येथे ६०० टन प्रतिदिन क्षमतेचा कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून सुमारे सात मेगावॉट वीजनिर्मिती केली जाणार आहे.  मे २०२६ मध्ये सदर प्रकल्प कार्यान्वित करण्याचा मानस असल्याची माहिती पालिकेने दिली.

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रकल्पासाठी विंडो कंपोस्टिंग आणि भस्मीकरण तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, या प्रकल्पाचे कंत्राट मेसर्स चेन्नई एमएसडब्ल्यू प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. हा करार एकूण १८ वर्षे ४ महिने कालावधीचा आहे. या कराराचा कालावधी ४ जून २०२२ पासून सुरू झाला आहे, तर या प्रकल्पाची एकूण किंमत १०२० कोटी रुपये इतकी आहे. यात कोणतीही वाढ झालेली नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

देवनार डम्पिंग ग्राऊंडवर ९ एकर जागेत ‘वेस्ट टू पॉवर प्लांट’ उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास आला असून, पुढील सात महिन्यांत त्याचा वापर सुरू केला जाणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आम्हाला पर्यावरण विभागाची परवानगी हवी होती. मागील अनेक दिवस परवानगी मिळाली नव्हती. मात्र, आता आठवडाभरापूर्वीच पर्यावरण विभागाने आम्हाला परवानगीचे पत्र पाठवले आहे. आता या प्रकल्पाला आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या असून, पुढील सात महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित होऊन प्रत्यक्षात वीज निर्मिती सुरू होईल, अशी माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *