राज्यपालांच्या वक्तव्यावर आता राजकारण सुरू आहे

 राज्यपालांच्या वक्तव्यावर आता राजकारण सुरू आहे

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यपाल भगतसिंग कोशियारि यांनी आपल्यासमोर वक्तव्य करूनही आपण काहीच बोललो नाही हे शरद पवार यांच्या आता लक्षात आले त्यामुळे त्यांनी आज त्यावर प्रतिक्रिया दिली , त्यांनी ती दिल्यावर उध्दव ठाकरे यांना ती द्यावीच लागते म्हणूनच यावर आता राजकारण सुरू झाले आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.Politics is now going on over the governor’s statement

पवार आणि ठाकरे यांच्या वक्तव्यावर ते प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत होते. छत्रपती उदयनराजे यांनी पत्र लिहून शरद पवारांना याची आठवण करून दिल्यावर साधारण आठवड्यानंतर पवार यांनी आज प्रतिक्रया दिली , त्यांनी दिली म्हणून ठाकरेंनी दिली असेही फडणवीस म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याला नव्हे तर देशाला आदरणीय आणि वंदनीय आहेत त्यावर कोणीही राजकारण करू नये असे ते म्हणाले.

अक्कलकोट आणि इतर गावांबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यानी केलेली विधाने निरुपयोगी असून त्याबाबतचा वाद अनेक वर्षे सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, त्यात जो निर्णय होईल त्यापेक्षा अधिक मोठे कोणीही असणार नाही असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ML/KA/PGB
24 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *