भारताच्या विकासाच्या लक्ष्यात सहा गुणांची वाढ

 भारताच्या विकासाच्या लक्ष्यात सहा गुणांची वाढ

नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): निती आयोगाने (Policy Commission) गुरुवारी (03 जून) एसडीजी इंडिया निर्देशांक (SDG India Index) आणि डॅशबोर्ड 2020-21 ची तिसरी आवृत्ती प्रकाशित केली. याची सुरूवात 2018 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या (UN) सहकार्याने करण्यात आली. हा निर्देशांक सर्वसमावेशक विकास लक्ष्ये (एसडीजी) साध्य करण्याच्या दिशेने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या प्रगतीचे दस्तऐवजीकरण आणि त्यांचे मानांकन निश्चित करतो. आता हा निर्देशांक देशातील निरंतर विकास लक्ष्यांशी (एसडीजी) संबंधित प्रगतीवर नजर ठेवण्यासाठीचे प्राथमिक साधन बनले आहे. यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील स्पर्धेला चालना मिळाली आहे.

लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीने हे सकारात्मक पाऊल
This is a positive step towards achieving the goal

देशाच्या एकंदर एसडीजी गुणांमध्ये 6 अंकांची वाढ झाली आहे. 2019 मधील 60 वरून 2020-21 मध्ये 66 वर पोहोचला आहे. लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीने हे सकारात्मक पाऊल मुख्यत्वे लक्ष्य 6 (स्वच्छ पाणी आणि स्वच्छता) आणि लक्ष्य 7 (स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा) संबंधित देशव्यापी अनुकरणीय कामगिरीने प्रेरित आहे, ज्यात एकूण लक्ष्य गुण अनुक्रमे 83 आणि 92 आहेत. लक्ष्य आणि निर्देशकांच्या विस्तृत व्याप्तीमुळे एसडीजी इंडिया निर्देशांक (SDG India Index) 2020-21 राष्ट्रीय निर्देशांक फ्रेमवर्कसह (एनआयएफ) अपेक्षेप्रमाण अधिक साम्य राखत लक्ष्य आणि संकेतांकांच्या व्यापक कवरेजमुळे मागील आवृत्तीच्या तुलनेत अधिक मजबूत आहे.
एसडीजी इंडिया निर्देशांक (SDG India Index) प्रत्येक राज्य आणि केंद्र शासित प्रदेशासाठी 16 एसडीजीवर लक्ष्यनिहाय गुणांची गणना करते. एकूणच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे गुण 16 एसडीजींवरील त्यांच्या कामगिरीवर आधारित उप-राष्ट्रीय घटकाच्या एकूण कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी मोजण्यात आलेल्या लक्ष्य निहाय गुणांमधून काढले जातात. हे गुण 0 ते 100 दरम्यान असतात आणि जर एखाद्या राज्य / केंद्रशासित प्रदेशाला 100 गुण मिळाले तर ते त्या राज्याने / केंद्रशासित प्रदेशाने 2030 चे लक्ष्य गाठले आहे हे सत्य प्रतिबिंबित करते. एखाद्या राज्य / केंद्रशासित प्रदेशाचे गुण जितके अधिक तेवढे त्याने लक्ष्य प्राप्त केलेले असेल.

अजेंडा साध्य करण्याच्या दृष्टीने एक तृतीयांश पल्ला गाठला
In terms of achieving the agenda Reached one-third

निती आयोगाचे (Policy Commission) मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले की, हा अहवाल एसडीजी प्रयत्नांमध्ये आम्ही तयार केलेली आणि मजबूत केलेली भागीदारी प्रतिबिंबित करतो. यात नमूद करण्यात आलेले तपशील सहकार्याशी संबंधित पुढाकाराचे परिणाम चांगले आणि अधिक परिणामकारक असू शकतात यावर प्रकाशझोत टाकतात. 2030 चा अजेंडा साध्य करण्याच्या दृष्टीने आम्ही एक तृतीयांश पल्ला गाठला आहे आणि पुढील प्रवास अद्याप शिल्लक आहे.
 
The Policy Commission on Thursday (June 03) released the third edition of the SDG India Index and Dashboard 2020-21. It was launched in 2018 in collaboration with the United Nations. This index documentes and determines the progress made by the States and Union Territories towards achieving the Inclusive Development Goals (SDGs).
PL/KA/PL/4 JUNE 2021

mmc

Related post