पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी पोलीस सज्ज

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी पोलीस सज्ज

नागपूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi हे 11 डिसेंबर ला नागपूरात येत आहेत, पंतप्रधानांच्या या नागपूर दौऱ्यासाठी नागपूर पोलीस सज्ज असून बंदोबस्तासाठी तब्बल 3500 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात राहणार असल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज दिली आहे .

याशिवाय आजूबाजूच्या परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असून सर्वत्र सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार, 11 डिसेंबर रोजी नागपुरात समृद्धी एक्स्प्रेस वे सह विविध प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी 9.30 वाजता दिल्लीहून नागपूर विमानतळावर पोहोचतील. नागपूर विमानतळावरून मोदी रस्त्याने नागपूर रेल्वे स्थानकापर्यंत प्रयाण करतील, तेथून ते नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील आणि खापरी स्थानकावर पोहोचतील.

खापरी स्थानकावरून पंतप्रधान समृद्धी एक्स्प्रेस वे च्या झिरो माईलपर्यंत जाणार आहेत . झिरो माईल पासून ते ५२१ किमी लांबीच्या नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करतील.

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नागपुरातील एम्स रुग्णालयाजवळील मैदानावर एका सभेला संबोधित करतील आणि इतर प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवतील अशी अधिकृत माहीतीही त्यांनी यावेळी दिली.Police ready for Prime Minister Narendra Modi’s visit

ML/KA/PGB
7 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *