गडकरी प्रकरणी बेळगावच्या हिंडलगा जेल वर पोलिसांचा छापा

 गडकरी प्रकरणी बेळगावच्या हिंडलगा जेल वर पोलिसांचा छापा

बेळगाव, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘गुगल पे’वर 10 कोटी पाठवा आणि पोलिसांना सांगू नका, अशा आशयाचा फोन बेळगावच्या तुरुंगातील कुख्यात आरोपीने दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी सकाळी केला. जयेश पुजारी ऊर्फ जयेश कांथा असे फोन करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

त्याने यापूर्वी 14 जानेवारी 2023 रोजी गडकरींच्या कार्यालयात तीन फोन केले होते. त्यावेळी त्याने डी गँगचा सदस्य असल्याचे सांगत 100 कोटींची मागणी केली होती. हा फोन बेळगावच्या तुरुंगातून आल्याचं निष्पन्न झालं होतं.

मंगळवारी सकाळी 10.53 आणि 11.08 वाजता पुन्हा धमकीचे फोन आले. त्यावरून जयेशने रझिया नावाच्या तरुणीचा मोबाइल क्रमांक देऊन त्यावर गुगल पे द्वारे 10 कोटी रूपये मागितले. दाऊद गँगचा सदस्य असल्याचा पुनरुच्चार त्याने केला. लोकेशन तपासले असता बेळगावच्या तुरुंगाचे निघाले.Police raid on Hindalga Jail in Belgaum in Gadkari case

केंद्रीय एजन्सी आणि शहर पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेचे निरीक्षण करून गरजेनुसार सुरक्षा वाढविली. रझिया ही युवती सामान्य कुटुंबातील आहे. ती इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करते. तिचा बॉयफ्रेंड बेळगावच्या हिंडलगा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तिची आणि जयेशची ओळख झाली.   रझियाच्या बॉयफ्रेंडने जयेशच्या मोबाइलवरून तिच्याशी संपर्क साधला. याप्रकारे रझियाचा मोबाइल क्रमांक जयेशकडे आला.

खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात आता एका तरुणीला कर्नाटकातील मंगळुरु पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. मिरज पोलिसांची एक टीम काल रात्री तातडीनं बेळगावला रवाना झाली आहे.

या प्रकरणात नागपुरातल्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये जीवे मारण्याची धमकी तसंच खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ML/KA/PGB
24 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *