‘प्रोजेक्ट ग्रीन फार्मसी’ उपक्रमासाठी पितांबरीचा पुढाकार !

 ‘प्रोजेक्ट ग्रीन फार्मसी’ उपक्रमासाठी पितांबरीचा पुढाकार !
  • सीएसआर अंतर्गत दिली वाहन सुविधा

ठाणे, दि ३१: ‘आर-निसर्ग’ या संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट ग्रीन फार्मसी’या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत शहरातील विविध ठिकाणी कालबाह्य औषधांची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून या समाजोपयोगी उपक्रमाला हातभार लावण्यासाठी पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. या कंपनीने महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पितांबरी कंपनीने आपल्या सीएसआर अंतर्गत आर निसर्ग संस्थेला कायनेटिक एनर्जी (इलेक्ट्रिक) वाहन प्रदान केले असून या वाहनाचे आज नौपाडा येथील पितांबरीच्या कार्यालयात पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रविंद्र प्रभुदेसाई, व्हाइस चेअरमन परीक्षित प्रभुदेसाई व ‘आरनिसर्ग’ संस्थेच्या को-फाउंडर डॉ. लीना केळशीकर व लता घनशामनानी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत शहरातील विविध ठिकाणी जसे की क्लब हाऊस, निवासी संकुले तसेच केमिस्ट शॉप्स अशा सुमारे १०० ठिकाणी ‘टेक बॅक बिन’ अर्थात औषध संकलन बिन बसविण्यात येणार आहेत. या बिनमध्ये नागरिकांना कालबाह्य, खराब अथवा वापरात नसलेली औषधे सुरक्षितपणे जमा करता येणार आहेत. बिन भरल्यानंतर त्यावर असलेला क्यू-आर कोड स्कॅन केल्यास संबंधित यंत्रणेला सूचना प्राप्त होईल आणि त्यानंतर पितांबरीकडून देण्यात आलेल्या वाहनाद्वारे ही औषधे संकलित करण्यात येतील.
यामुळे नागरिकांना वापरात नसलेली व कालबाह्य औषधे सुरक्षितरीत्या जमा करता येणार असून, पर्यावरणाचे संरक्षण व प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच हा उपक्रम हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन पितांबरी कंपनी आणि आर-निसर्ग संस्थेमार्फत करण्यात आले आहे.AG/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *