संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौष वारीला प्रारंभ

 संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौष वारीला प्रारंभ

नाशिक, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ जगद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या संत श्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज की जय घोषात निवृत्तीनाथांच्या पौषवारीला प्रारंभ झाला आहे.

मंगळवारी रात्री अकरा वाजल्या पासून बुधवारी पहाटे पाच वाजेपर्यंत निवृत्तीनाथ संस्थांच्या वतीने आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शासकीय महापूजा करून पौष वारीला प्रारंभ करण्यात आला .करोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये निवृत्तीनाथांच्या भेटीला आसुसलेल्या देशभरातील लाखो वारकऱ्यांनी गेल्या दोन दिवसापासून त्रंबकेश्वर कडे पायी अथवा विविध वाहनातून मार्गक्रमण करत निवृत्तीनाथांच्या भेटीची धडपड नाथांच्या समाधीवर मस्तक टेकविल्यानंतर चेहऱ्यावरील समाधानाने पूर्ण झाली.

महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश मधून 500 पेक्षा अधिक दिंड्या त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले असून त्रंबकेश्वर मधील रस्त्यावर रात्रीच्या अंधारात लाखो भाविक मंदिराच्या दिशेने चालतानाचे दृश्य दिसत होते तर त्र्यंबकेश्वरच्या परिसरामध्ये ठीक ठिकाणी टाळ मृदुंगाच्या गजरात जय हरी विठ्ठल आणि निवृत्तीनाथांचा नामघोष सुरू होता. प्रथेप्रमाणे रात्री अकरा वाजता संत निवृत्तीनाथ संस्थांनच्या वतीने महापूजा विधी सुरू झाला यावेळी निवृत्तीनाथ संस्थांनचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी मंदिराचे पूजाधिकारी यांच्या हस्ते मंदिरातील संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी आणि विठ्ठल रखुमाई च्या मूर्तीची महापूजा आणि आरती करण्यात आली.

महापूजा सुरू असताना गाभार्‍या समोरील सभा मंडपामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांचा आणि जय हरी विठ्ठल जय घोष वारकरी करीत होते. या पूजाविधी नंतर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे आणि त्यांच्या परिवाराच्या हस्ते शासकीय महापूजेला प्रारंभ झाला दादा भुसे, त्यांच्या पत्नी आणि परिवारातील अन्य सदस्यांनी निवृत्तीनाथ समाधीचे विधिवत पूजन करून महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी आशीर्वाद मागितले.

यावेळी दर्शन रांगेतील औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील मनोळे येथील वारकरी विलास माधवराव सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी मीराबाई यांना प्रमुख वारकऱ्याचा मान मिळाला दोन वर्षाच्या त्र्यंबकेश्वर येथे पौष वारी होऊ न शकल्याने यंदा वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह जाणवत आहे. सुमारे चार लाख भाविक वारकरी 500 पेक्षा अधिक दिंड्यातून त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पौष वारीचा हा सोहळा20 तारखेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाने सुरू राहणार आहे. आज संध्याकाळी निवृत्तीनाथ महाराजांच्या रथाची त्र्यंबकेश्वर नगरीत नगर परिक्रमा होणार आहे. तसेच विविध दिंड्यांमध्ये कीर्तन प्रवचन दिवस-रात्र सुरू राहणार असून भाविक निवृत्तीनाथ मंदिराच्या दर्शनाबरोबरच पवित्र कुशावरताच स्नान करून श्री त्रंबक राज्याचे दर्शन घेत आहेत. शासकीय पूजेनंतर त्रंबक नगरपालिका आणि निवृत्तीनाथ संस्थांच्या वतीने पालकमंत्री दादा भुसे यांचा परिवार आणि अन्य मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

निवृत्तीनाथ संस्थानातर्फे प्रसाद शाल श्रीफळ आणि निवृत्तीनाथांची प्रतिमा देऊन मान्यवरांना सन्मानित करण्यात आले निवृत्तीनाथ देवस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळांनी दोन महिन्यापूर्वीच कार्यभार स्वीकारला असून दोन वर्षाच्या कालखंडानंतर वारकऱ्यांच्या अलोट गर्दीने होणारी पौष वारीचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान विश्वस्त मंडळासमोर आहे.

ML/KA/SL

18 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *