पाकच्या क्रिकेटपटूला भर मैदानात बलात्काराच्या आरोपाखाली अटक

 पाकच्या क्रिकेटपटूला भर मैदानात बलात्काराच्या आरोपाखाली अटक

पाकिस्तानचा युवा बॅटर हैदर अली याला इंग्लंडमध्ये बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही घटना 3 ऑगस्ट 2025 रोजी घडली असल्याचं सांगितलं जात आहे. Telecomm Asia Sports च्या रिपोर्टनुसार, हैदर अली इंग्लंडमध्ये पाकिस्तान ‘ए’ टीम (पाकिस्तान शाहीन) कडून मेलबर्न क्रिकेट क्लब विरुद्ध कँटरबरी मैदानावर सामना खेळत असताना, ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी त्याला थेट मैदानातून ताब्यात घेतलं.

काही वेळाने त्याला जामिनावर सोडण्यात आलं असलं, तरी त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे, जेणेकरून तो इंग्लंड सोडून जाऊ शकणार नाही. ही घटना समोर आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) देखील कारवाई केली असून, त्याला सध्या निलंबित करण्यात आलं आहे.

या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, आरोप करणारी महिला पाकिस्तानी वंशाचीच आहे. PCB च्या एका अधिकाऱ्याने यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, बोर्ड या प्रकरणाची ब्रिटनमध्ये चौकशी करेल आणि या कठीण काळात हैदर अलीला शक्य ती सर्व मदत करेल.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *