26/11 च्या शहिदांच्या स्मृती प्रित्यर्थ सांगली ते मुंबई ‘शहीद दौड चे आयोजन

 26/11 च्या शहिदांच्या स्मृती प्रित्यर्थ सांगली ते मुंबई ‘शहीद दौड चे आयोजन

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई येथील २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात पोलीस जवानांनी मोठ्या धाडसाने अतिरेक्यांच्या हल्ल्याला तोड देत आपल्या प्राणांची बाजी लावली. या शहीद वीरांना अभिवादन करण्यासाठी शहीद अशोक कामटे स्मृती फाऊंडेशनतर्फे सांगली इथे सतत १२ वर्षा पासून इंटरनॅशनल मॅरेथान स्पर्धाचे आयोजन करण्यात येते.
या वर्षी देखील 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांच्या स्मृती प्रित्यर्थ सांगली ते मुंबई ‘शहीद दौड चे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती राज्याचे अपर पोलीस महासंचालक (नियंत्रण वैध मापन शास्त्र) रवींद्र कुमार सिंघल यांनी प्रेस क्लब मध्ये बोलताना दिली.Organization of ‘Shaheed Run’ from Sangli to Mumbai in memory of 26/11 martyrs

सध्या ही दौड 470 किमी ची असून 22 नोव्हेंबर रोजी सांगली येथून सुरू होवून 26 नोव्हेंबर रोजी मुंबईत ती दाखल होणार आहे. या दौडमध्ये आमचे २५ धावपटू मशाल व भारताचा तिरंगा हातात घेवून शहीदांना अभिवादन करत सांगली – कराड – सातारा- पुणे-लोणावळा- खोपोली – पनवेल- नवी मुंबई मार्गे २६ नोव्हेंबर रोजी गेट वे ऑफ इंडीया येथे पोहचतील.

आपल्या मायभूचे रक्षण करणे व आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवणे ही प्रत्येक भारतीय व्यक्तीची जबाबदारी आहे. या देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांची पराक्रमाची आणि त्यागाची गाथा येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरावी हा या ‘शहीद दौड’ या उपक्रमाचा हेतू आहे.असे सिंघल यांनी सांगितले.

‘शहीद दौड़’ चे शुक्रवार 25 नोव्हेंबर रोजी सांयकाळी मुंबईत आगमन होईल. शनिवार 26 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.30 वाजता माटुंगा (फाईव्ह गार्डन) येथून शहीद दौडला सुरुवात होवून दादर-शिवाजी पार्क- सिद्धीविनायक मंदिर पेडर रोड मार्गे शहीद तुकाराम ओंबळें स्मारक ( गिरगांव चौपाटी) येथे सकाळी 6.45 वा पोहोचणार आहे. 7 वा सदर ठिकाणावरून ते गेट वे ऑफ इंडीया ही 5 कि.मी. ची मुंबईकर नागरिक यांच्यासाठी शहीद दौड होणार आहे. पुढे 8 वा गेट वे ऑफ इंडिया येथून सीपी ऑफिस येथील शहीद स्मारक येथे शहिदांना अभिवादन करत शहीद दौडचा समारोप होईल.

ML/KA/PGB
16 Nov .2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *