कोकणात दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन

 कोकणात दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन

सिंधुदुर्ग, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात आज भक्तीभावपूर्ण वातावरणात दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले . काल उत्साहात स्वागत झालेल्या बापाचे दीड दिवसात स्वागत आणि पाहुणचार केल्यानंतर आज अनेक जण बाप्पाला गणपती बाप्पा मोरया , पुढल्या वर्षी लवकर या म्हणत निरोप देण्यात आला. बाप्पाला विसर्जनाला नेण्यापूर्वी बाप्पाची आरती केली जाते .

नेहमीच्या आरत्यांपेक्षा जास्त वेळ आरती आज केली जाते .जेणेकरून बाप्पाचे विसर्जन काहीसे लांबावे आणि बाप्पाचा सहवास काही काळ अधिक मिळावा . सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसामुळे विसर्जनामध्ये वारंवार व्यत्यय आला.

ML/KA/SL

20 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *