सिद्धेश्वर यात्रेत 68 लिंगाचा तैलाभिषेक सोहळा सुरू….

 सिद्धेश्वर यात्रेत 68 लिंगाचा तैलाभिषेक सोहळा सुरू….

सोलापूर, दि.13 (एमएंमसी न्यूज नेटवर्क) :  सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेमध्ये आज यन्नीमजन अर्थात 68 लिंगांचा तैलाअभिषेक सोहळा संपन्न झाला. शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी सोलापूर शहरात स्थापन केलेल्या 68 लिंगांना दिवसभर मानाच्या सातही नंदीध्वजाच्या काठ्यांनी जाऊन मानकऱ्या समवेत अभिषेक केला.

यात्रेतील मुख्य धार्मिक कार्यक्रम असणाऱ्या विवाहसोहळ्यापूर्वी हळदीचा कार्यक्रम म्हणून पहिला तैलाअभिषेक कार्यक्रमाकडे पाहिले जाते. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर यंदा प्रथमच मोठ्या उत्साहात सिद्धेश्वर यात्रा भरली आहे.

सिद्धेश्वर यात्रा लमध्ये सिद्धरामेश्वर यांच्या योगदांडाचा कुंभारकन्येशी विवाह होतो. अशी अख्यायिका आहे. या विवाहाचा एक भाग म्हणून सोलापूर शहरातील 68 लिंगांना तैलाअभिषेक आज घातला जातो. याची सुरुवात यात्रेतील प्रमुख मानकरी असणारे हिरेहब्बु यांच्या वाड्यातून आज सकाळी झाली.

हब्बु वाड्यात योगदंडसह मानाच्या दोन्ही काठ्यांची विधिवत पूजा व आरती झाली. त्यानंतर पालखीसह सर्व मानाच्या नंदिध्वजाच्या काठ्या सिद्धेश्वर मंदिरातील अमृत लिंगाजवळ आल्या. येथे मानकरांना विडा देण्याचा कार्यक्रम झाला. आणि येथून शहरांमध्ये सवाद्य मिरवणुकीने मानकरी व सर्व काठ्या व भक्तगण हे 68 लिंगांच्या अभिषेकासाठी मार्गस्थ झाले.

बाराबंदी पोशाख परिधान करून “एकदा बोला भक्तलिंग…हर हर हर… सिद्धेश्वर महाराज की जय…” अशा नामघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला. यावेळी महापालिका आयुक्त शितल तेली उगले , माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे , आमदार विजयकुमार देशमुख , प्रणिती शिंदे यांच्यासह आजी – माजी लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.

ML/KA/SL

13 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *