वाघांची संख्या वाढली, आता मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपायोजनांची गरज …

 वाघांची संख्या वाढली, आता मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपायोजनांची गरज …

वाघांची संख्या वाढली, आता मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपायोजनांची गरज …

चंद्रपूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  देशातील व्याघ्र संवर्धनाचा परिणाम म्हणजे नुकतीच वाघांची जाहीर झालेली आकडेवारी. देशात वाघांची संख्या समाधानकारकरीत्या वाढली असताना चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षात गेल्या वर्षभरात 50 हून अधिक ग्रामस्थांचे मृत्यू झाले आहेत.Number of tigers increased, now measures are needed to avoid human wildlife conflict…

एखाद्या व्याघ्र प्रकल्पापेक्षा अधिक वाघ ब्रह्मपुरी तालुक्यातील प्रादेशिक जंगलात आढळले आहेत. याशिवाय गेल्या काही वर्षात कोळसा खाणी, औद्योगिक क्षेत्रे ,आयुध निर्माणी यासारख्या औद्योगिक आणि मुख्यत्वे शहरी भागातही वाघांचे नवे अधिवास निर्माण झाले आहेत. यातून गेली काही वर्षे वनव्याप्त क्षेत्रातील गावात कोरोनासारखा टायगर लॉकडाऊन बघायला मिळत आहे.

यामुळे वाघांविरोधात नकारात्मक भावना निर्माण होत आहे. ज्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात हजारो रुपये खर्च करून पर्यटक व्याघ्र सफारीसाठी येतात, त्याच वाघाचे ग्रामीण भागात लाठ्याकाठ्यांनी व प्रसंगी विषप्रयोगासारखी वागणूक दिली जाते. अशा स्थितीत वाघांची वाढती संख्या, त्यांच्यासाठीचे घटते जंगल, अतिक्रमण झालेले भ्रमण मार्ग याविषयी वनविभाग व प्रशासकीय पातळीवर व्यापक प्रयत्नांची गरज तज्ञांनी व्यक्त केली आहे.

ML/KA/PGB
10 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *