वादळी वाऱ्यासह पाऊस, झाड पडल्याने 7 भाविकांचा मृत्यू

 वादळी वाऱ्यासह पाऊस, झाड पडल्याने 7 भाविकांचा मृत्यू

अकोला, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज मंदिरातील टिन शेड वर पाऊस , वाऱ्यामुळे कडुलिंबाचे झाड कोसळल्यामुळे मंदिरात उपस्थित असलेली 30 ते 35 व्यक्ती टीन शेड खाली दबल्यामुळे गंभीर जखमी झाली होती तर या घटनेमध्ये सात लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.7 devotees died due to falling tree in rain with stormy wind

या संदर्भात जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रात्री उशिरापर्यंत मदत कार्य पारस येथे सुरू होते यावेळी विभागीय आयुक्त यांनीही अकोला येथे भेट देऊन जखमींची विचारपूस केली रविवार असल्यामुळे मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती त्यातच मंदिराच्या लगत असलेले मोठे झाड टिन शेड वर पडल्यामुळे टीन शेड खाली असलेले भाविक दबल्यामुळे सात लोकांचा मृत्यू झाला.

मुख्यमंत्री मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संपूर्ण घटनेची माहिती जिल्हाधकाऱ्यांमार्फत घेतली असून याविषयी शोक व्यक्त केला आहे, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांची मदत त्यांनी जाहीर केली आहे.जखमींवर संपूर्ण शासकीय खर्चाने उपचार करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

ML/KA/PGB
10 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *