आता RBI घेऊन येत आहे Digital रुपया- जाणून घ्या तपशील

 आता RBI घेऊन येत आहे Digital  रुपया- जाणून घ्या तपशील

मुंबई,दि.१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील एक महत्त्वपूर्ण अर्थव्यवस्था म्हणून वाटचाल सुरू असताना भारतीय अर्थ व्यवस्था आता एक नवीन झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे.  भारतीय रिझर्व्ह बॅंक आता  स्वतःचे डिजिटल चलन (RBI Digital Currency) प्रत्यक्षात आणत आहे. रिझर्व्ह बँक (RBI) आजपासून घाऊक व्यवहारांसाठी डिजिटल चलन सुरू करणार असून सध्या ते पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू होणार आहे. Now RBI Brings Digital Rupee- Know Detail

या बदलामुळे भारताची डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल, पेमेंट सिस्टम अधिक कार्यक्षम होईल आणि मनी लाँडरिंगला प्रतिबंध होईल असे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

सरकारी रोख्यांच्या सेटलमेंटसाठी डिजिटल चलनाचा वापर केला जाईल. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी ९ बँकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय स्टेट बँक (एसबीआय), बँक ऑफ बडोदा (BoB), युनियन बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, IDFC फर्स्ट बँक आणि HSBC बँक यांचा समावेश करण्यात आला आहे.

डिजिटल चलन (ई-रुपी) सुरू झाल्यानंतर, रोख ठेवण्याची गरज पडणार नाही. डिजिटल चलन तुम्ही तुमच्या मोबाईल वॉलेटमध्ये ठेवू शकता आणि या डिजिटल चलनाच्या चलनावर रिझर्व्ह बँकेचे पूर्ण नियंत्रण असेल. डिजिटल चलन सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी आणि सरकारसोबतच्या व्यवसायासाठीच्या व्यवहारांची किंमत कमी होईल.

डिजिटल रूपी किंवा डिजिटल चलन डिजिटल अर्थव्यवस्थेची पुढची पायरी असेल. ज्याप्रमाणे मोबाईल वॉलेटमधून काही सेकंदात व्यवहार होतात, त्याचप्रमाणे डिजिटल चलनाचा देखील वापर केला जाईल. यामुळे रोख रकमेचा त्रास कमी होईल, ज्याचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर मोठा सकारात्मक परिणाम होईल.

डिजिटल रुपयामुळे सध्याच्या चलनी नोटांची व्यवस्था बंद होणार नाही उलट, लोकांना व्यवहाराचा दुसरा पर्याय मिळेल. चलनी नोट प्रणाली आणि डिजिटल चलन प्रणाली दोन्ही कार्य करतील.

SL/KA/SL
1 Oct. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *