आता KYC साठी बँकेत जायची गरज नाही
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने बॅंक ग्राहकांचे काम सोपे करणारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केवायसीचे नियम आता आणखी सोपे केले आहेत. आता केवायसी करण्यासाठी बँक ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. आता नवीन KYC प्रक्रिया घरबसल्या किंवा कुठेही व्हिडिओ आधारित ग्राहक ओळख प्रक्रियेद्वारे पूर्ण केली जाऊ शकते. बँकेच्या रेकॉर्डमध्ये उपलब्ध केवायसी कागदपत्रे अधिकृतपणे वैध कागदपत्रांच्या सध्याच्या सूचीशी जुळत नसल्यास, काही प्रकरणांमध्ये नवीन केवायसी प्रक्रिया किंवा कागदपत्रे तयार करावी लागतील असे आरबीआयने सांगितले.
आरबीआयने ५ जानेवारी २०२३ रोजी जाहीर केलेल्या एका निवेदनात स्पष्ट केले आहे की, नवीन KYC प्रक्रिया कुठेही बसून व्हिडिओ-आधारित ग्राहक ओळख प्रक्रियेद्वारे किंवा बँकेच्या शाखेत जाऊन केली जाऊ शकते. आरबीआयने म्हटले आहे की केवायसीमध्ये कोणताही बदल न झाल्यास ग्राहक केवळ स्वयं-घोषणा देऊन पुन्हा केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकतो, जे पुरेसे मानले जाईल. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बँकांना अशी सुविधा देण्यास सांगण्यात आले आहे, ज्यामध्ये ग्राहकांच्या सेल्फ-डिक्लेरेशनची प्रक्रिया समोरासमोर नसलेल्या चॅनेलद्वारे पूर्ण केली जाऊ शकते.भारतीय मध्यवर्ती बँक, रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) KYC मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँकांना त्यांच्या खातेदारांची ग्राहक ओळख दस्तऐवज वेळोवेळी अपडेट करणे आवश्यक आहे. कागदपत्रे सादर केल्यानंतरही केवायसीच्या नावाखाली बँका ग्राहकांना वारंवार त्रास देत असल्याच्या तक्रारी बँकांविरुद्ध आरबीआयकडे सातत्याने येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
SL/KA/SL
6 Jan 2023