DRDO ने सैनिकांसाठी तयार केले अधिक टिकणारे खाद्यपदार्थ

 DRDO ने सैनिकांसाठी तयार केले अधिक टिकणारे खाद्यपदार्थ

नागपूर, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्राण पणाला लावून सीमेवर ऊन, वारा,थंडी, पाऊस यांची तमा न बाळगता अहोरात्र तैनात असणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी दोन वेळचे जेवण मिळणेही अनेकदा दुरापास्त होते. अशाच दुर्गम आणि विपरीत परिस्थितीत अडकलेल्या सैन्यातील जवानांसाठी संरक्षण, संशोधन आणि विकास या संघटनेच्या वतीने  एक वर्षाहून अधिक काळ टिकू शकेल असे खाद्य पदार्थ तयार करण्यात आले आहे.

नागपूर येथे 108 व्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये संरक्षण दलाची निगडित डीआरडीओ या संस्थेच्या वतीने सैन्यातील जवानांसाठी अन्नावर असलेल्या विविधाअंगी संशोधनाचे प्रदर्शन येथे मांडण्यात आले आहे. त्यात या खाद्य पदार्थाचा समावेश करण्यात आला आहे.

वाळवंट, जंगल, बर्फाच्छादित प्रदेश, उंच गिरीशिखरे, तर दूरवर खोल समुद्रातील पाण्यात तैनात राहून आपले कर्तव्य  बजावणाऱ्या  सैनिकांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन जवानांना अन्नपुरवठा करण्यासाठी विशेष किट तयार करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने झटपट तयार होणारे रेडी टू इट खाद्य पदार्थांसह एक वर्षाहून अधिक काळ टिकू शकेल अशा पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.

फळांचा रस, वरण भात, नाष्टा, अशा पदार्थाचा समावेश आहे.  तसेच  दुर्गम भागात आणि प्रतिकूलविशेष म्हणजे प्रत्येक प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीत स्थितीत टिकेल असे अन्न या संस्थेतर्फे तयार करण्यात आले आहे परिस्थितीत जेवण गरम  करण्यासाठी  पोर्टेबल स्टो आणि सेल्फ हिटिंग सिस्टीम तयार केली आहे.  या कीटमधील अन्नपदार्थ तर एक वर्षांहून अधिक काळ टिकू शकतात.

 

SL/KA/SL

6 Jan 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *