आता संघाच्या शाखा वाढविण्याचे उद्दिष्ट

 आता संघाच्या शाखा वाढविण्याचे उद्दिष्ट

नागपुर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गेल्या वर्षभरापासून कार्य विस्ताराच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असून देशभरात संघाच्या शाखांची संख्या ६२ हजारांवरून ६८ हजार झाली आहे. वर्षभरात सहा हजाराने संघ शाखा वाढल्या असून येत्या वर्षभरात ही संख्या एक लाखांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यकारिणी सदस्य दीपक तामशेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.Now aiming to expand

पानीपत मध्ये झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेसंदर्भात नागपुरात पत्रकार परिषदेत माहिती देताना दीपक तामशेट्टीवार यांनी संघ कार्यविस्ताराची माहिती दिली. २०२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या विस्तारावर भर देत प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट संघाने ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.

ML/KA/PGB
17 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *