औषध खरेदीसाठी आता स्वतंत्र महामंडळ
नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील वैद्यकीय रुग्णालयातील औषध खरेदीसाठी हाफकिनच्या धर्तीवर स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन Medical Education Minister Girish Mahajan यांनी विधानसभेत दिली आहे, याबाबतच्या लक्षवेधी वर ते ऊतर देत होते . राज्यातील तंत्रज्ञांची साडेचार हजार पदांची भरती येत्या चार महिन्यात केली जाईल असे ही ते म्हणाले.
मुंबईतील जे जे रुग्णालयाच्या शेजारील बंद पडलेली रिचर्डसन कृडास ही कंपनी बंद पडली आहे, ती सरकारी १८एकर जागा आहे, ती ताब्यात घेऊन तिथे कॅन्सर साठी अद्ययावत रुग्णालय उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे, ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मात्र त्यात तडजोड करण्याचे काम सुरू आहे असं महाजन यांनी सांगितलं.Now a separate corporation for drug procurement
नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात व्हेंटिलेटर न मिळाल्याने एका मुलीच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी तिथले अधिष्ठाता डॉ गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे, तर संबधित डॉ सपकाळ यांची विभागीय चौकशी करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी यावरच्या लक्षवेधी वर दिली, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ती उपस्थित केली होती.
नागपुरात या आणि मेयो रुग्णालयात दहा लाखांहून अधिक रुग्ण येतात त्यांना सुविधा आणि उपचार नीट मिळत नाही असा आरोप त्यांनी केला होता.त्यासाठी अधिक निधी उपलब्ध करून देऊन वाढीव नवीन इमारतीचे बांधकाम, पद भरती , औषध खरेदी आदी उपाययोजना करण्यात येत आहे असं महाजन यांनी सांगितलं.
या रुग्णालयातील काही डॉक्टर कट प्रॅक्टिस आणि खासगी प्रॅक्टिस करतात हे मान्य करून महाजन यांनी यावर कारवाई करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं.
ML/KA/PGB
21 Dec .2022