सांस्कृतिक विभागाचे आता नवीन पोर्टल
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यभरातील कलाकार आणि त्यांच्या कलेविषयी माहिती देणारं सांस्कृतिक विभागाचं पोर्टल सुरू करण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.Now a new portal of the Cultural Department
शाहीर कलावंतांच्या विविध मागण्यांबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.या पोर्टलवर कलाकार ,त्यांची कला,कलेची चित्रफीत, त्यांचे मानधन इत्यादी माहिती दिली जाईल,कलाकारांना कार्यक्रम मिळवण्याच्या तसंच त्यांच्या निवृत्तीच्या दृष्टीनें फायद्याचं ठरेल असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
कलाकारांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शिफारस करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.
ML/KA/PGB
9 Mar. 2023