उ.कोरियाचे हुकूमशहा किम जोंगना कोसळले रडू

प्योंगयांग, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकांचे हसणे, रडणे, चित्रपट पाहणे यावर बंदी घालणारे उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग यांना चक्क रडू कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काल रात्री देशातील महिलांना संबोधित करताना त्यांना रडू कोसळले.देशातील घटत्या जन्मदराबाबत चिंता व्यक्त करत किम जोंग यांनी महिलांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले. त्यावेळी त्यांना रडू कोसळ्याचे दिसून आले. किम व्यतिरिक्त कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक महिलांनाही यावेळी अश्रू अनावर झाल्याचे व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. महिलांना आवाहन करताना हुकुमशहांनी मुले जन्माला घालणे हे देशभक्तीचे काम असल्याचे म्हटले आहे.
किम जोंग म्हणाले, “जेव्हा सर्व मातांना समजेल की अनेक मुलांना जन्म देणे ही देशभक्ती आहे, तेव्हाच एक शक्तिशाली समाजवादी देश बनवण्याचे आमचे ध्येय पुढे जाणे शक्य होईल,ज्या कुटुंबांना अनेक मुले आहेत त्यांना घर, अन्न आणि वैद्यकीय सुविधांसाठी प्राधान्य दिले जाईल. ज्या मातांना जास्त मुले आहेत त्यांच्यासाठी अनुदान आणि उपचारांना प्राधान्य देण्यात येईल.
“
किम जोंग उन यांनी उत्तर कोरियाच्या महिलांना सावध माता, कृतज्ञ पत्नी आणि दयाळू सून बनण्याचे आवाहन केले. ते म्हणाले- आई जोपर्यंत कम्युनिस्ट होत नाही, तोपर्यंत तिच्या मुलांना कम्युनिस्ट म्हणून वाढवणे आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना क्रांतिकारक बनवणे अशक्य आहे.
अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, एक गरीब देश म्हणून उत्तर कोरियाचा जन्मदर फक्त 1.6 आहे, जो खूपच कमी आहे. तज्ज्ञांच्या मते, देशातील लोकसंख्या राखण्यासाठी जन्मदर 2.1 पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
SL/KA/SL
6 Dec. 2023