संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

 संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

मुंबई दि.6( एम एमसी न्यूज नेटवर्क): भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यास शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत वारंवार गैरहजर राहिल्याने शिवडी न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. याबाबतची सुनावणी 24 जानेवारी रोजी होणार आहे.

शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी मेघा सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला होता.

शिवडी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे मेधा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत, राऊत यांनी केलेले आरोप निराधार आणि पूर्णपणे बदनामीकारक असल्याचे म्हटले होते. तसेच राऊत यांना नोटीस बजावून मानहानीच्या आरोपाखाली फौजदारी कारवाई सुरू करण्याची मागणी केली होती.

मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात न्यायालयाने सुनावणी घेतली होती. आता २४ जानेवारी रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

ML/KA/PGB
06 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *