महाराष्ट्राच्या निवडणुकीत गडबड झालीय, राहुल गांधी, सुप्रिया सुळे, संजय राऊतांचा आरोप

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महायुती सरकार सत्तेवर आलं. पण हा पराभव महाविकास आघाडीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत या तीन नेत्यांनी शुक्रवारी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काहीतरी गडबड झाली असल्यानेच आम्ही विचारलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाकडून उत्तर दिलं जात नाही,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
ML/ML/PGB 7 Feb 2025