निफ्टी बँक इंडेक्सने प्रथमच ओलांडला ५० हजारांचा टप्पा

 निफ्टी बँक इंडेक्सने प्रथमच ओलांडला ५० हजारांचा टप्पा

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निफ्टी बँक निर्देशांकाने आज प्रथमच 50 हजारांचा टप्पा ओलांडून नवा इतिहास रचला आहे. निर्देशांक 40 हजारांवरून 50 हजारांवर जाण्यासाठी अडीच वर्षे लागली. ऑक्टोबर 2021 मध्ये निर्देशांकाने प्रथमच 40 हजारांचा चा टप्पा ओलांडला होताय निफ्टी बँक इंडेक्समध्ये सरकारी आणि खाजगी दोन्ही बँकांचे शेअर्स समाविष्ट आहेत.निफ्टी बँकेने गेल्या सहा वर्षांत दुपटीने वाढ केली आहे. निर्देशांकाने 27 जुलै 2017 रोजी प्रथमच 25 हजारांचा टप्पा पार केला.

निफ्टी बँकेत एकूण 12 शेअर्स आहेत. यापैकी केवळ तीन शेअर्स असे आहेत ज्यात गेल्या 6 वर्षांत कोणतीही वाढ झालेली नाही. हे शेअर्स इंडसइंड बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बंधन बँकेचे आहेत. बंधन बँकेचे शेअर्स जुलै 2017 च्या किमतीपेक्षा निम्मे झाले आहेत. त्याच वेळी या कालावधीत पीएनबी आणि इंडसइंड बँकेच्या शेअर्सचा परतावा देखील नकारात्मक आहे.

दुसरीकडे, आयसीआयसीआय बँकेने गेल्या 6 वर्षात बँक निफ्टीला वर नेण्यात सर्वाधिक योगदान दिले आहे. गेल्या 6 वर्षात निफ्टी बँकेने 25 हजार अंकांची वाढ केली आहे, त्यापैकी 39 टक्के योगदान एकट्या आयसीआयसीआय बँकेचे आहे. ही भारतातील दुसरी सर्वात मोठी खाजगी बँक आहे. अलीकडेच आयसीआयसीआयचे बाजार भांडवल 8 लाख कोटींच्या पुढे गेले होते. मार्च तिमाही निकालानंतर बँकेचे शेअर्स नवीन सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते. एचडीएफसी बँक आणि एसबीआयने बँक निफ्टीच्या रॅलीमध्ये अनुक्रमे 21 टक्के आणि 20 टक्के योगदान दिले.बँक निफ्टीने 2023 मध्ये 12.3 टक्के परतावा दिला होता. निफ्टीच्या सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या क्षेत्रीय निर्देशांकांपैकी हा एक होता. या वर्षी देखील निर्देशांकाचा आतापर्यंतचा परतावा सुमारे 4.56 टक्के आहे. याउलट, निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक 32.5 टक्के व रिअल्टी आणि ऑटो निर्देशांक अनुक्रमे 30 टक्के आणि 26 टक्के वाढले आहेत.

SL/ML/SL

3 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *