अनुकूल मॅक्रो इकॉनॉमिक डेटाच्या पार्श्वभूमीवर निफ्टी 22,000 च्या वर

 अनुकूल मॅक्रो इकॉनॉमिक डेटाच्या पार्श्वभूमीवर निफ्टी 22,000 च्या वर

मुंबई, दि. 17 (जितेश सावंत) : मागील आठवड्यातील घसरणीला रोखण्यात अपयशी ठरलेला बाजार या आठवड्यात यशस्वी होताना दिसला. सुरुवात काहीशी नकारात्मक होऊन सुद्धा निर्देशांक प्रत्येकी 1 टक्के वाढले. निफ्टीने 22,000 च्या वरचा टप्पा आरामात पार केला. जागतिक बाजारातील सकारात्मकता,किरकोळ महागाई आणि घाऊक महागाई (inflation) यात झालेली घट आणि शेवटच्या टप्प्यातील कंपन्यांचे जाहीर झालेले चांगले तिमाही निकाल यामुळे बाजाराने वरचा टप्पा गाठला.
येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष जागतिक घडामोडी व तेलाच्या किमती याकडे राहील.

Technical view on nifty-

शुक्रवारी निफ्टीने 22040.7चा बंद भाव दिला. निफ्टी साठी 22018-21962-21812-21797-21740.80-21697 हे महत्वाचे सपोर्ट(Support) आहेत हे तोडल्यास निफ्टी 21640-21598-21576.05-21547-21517-21500-21477-21448-21434-21365-21329-21285,हेस्तर गाठेल. तर वरच्या स्तरावर निफ्टी साठी 22126-
22183.30-22239.80 हे रेसिस्टन्स (Resistance) ठरतील.

सेन्सेक्स 523 अंकांनी घसरला

आठवड्याच्या पहिल्याच
दिवशी भारतीय बाजाराची सुरुवात सकारत्मक झाली परंतु ती सकारात्मकता टिकवण्यात बाजार अयशस्वी ठरला, जानेवारीच्या किरकोळ चलनवाढीच्या आणि डिसेंबरच्या आयआयपी डेटाच्या (January retail inflation and December IIP output data ) आधी गुंतवणूकदारांनी बाजारात तीव्र विक्रीचा मारा सुरु झाल्याने बाजार गडगडला. सेन्सेक्स मध्ये 600 अंकांपेक्षा जास्त घसरण झाली.Sensex drops 523 pts, Nifty tests 21,600 ahead of Jan CPI data

अनुकूल मॅक्रो इकॉनॉमिक डेटाच्या पार्श्वभूमीवर बाजारात जोरदार तेजी

अनुकूल मॅक्रो इकॉनॉमिक डेटाच्या पार्श्वभूमीवर, बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे मागील सत्रात मोठी घसरण होऊन देखील बाजारात जोरदार तेजी दिसून आली, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी झाली. सेन्सेक्समध्ये 500 अंकांपेक्षा जास्त वाढ झाली. निफ्टीने 21,700 च्या वर बंद होण्यात यश मिळवले.Market bounces back on favourable data

बाजाराची स्मार्ट रिकव्हरी
अमेरिकेतील महागाईचे आकडे अपेक्षेपेक्षा जास्त आल्याने जागतिक बाजारात विक्रीची नोंद झाली आणि याचा परिणाम बुधवारी सकाळी मोठ्या घसरणीसह उघडलेल्या देशांतर्गत शेअर बाजारावरही होताना दिसला.अमेरिकेतील उच्च चलनवाढीच्या आकडेवारीचा फेडरल रिझर्व्ह व्याजदरात लवकरच कपात करण्याची शक्यता नाही असा अर्थ निघत असल्याने बाजरात मोठी घसरण झाली.परंतू अत्यंत अस्थिर सत्रात SBI आणि इतर PSU बँकांच्या तेजीमुळे बाजाराने चांगली रिकव्हरी केली.सेन्सेक्सने दिवसाच्या नीचांकावरून 1,023 अंकांची वसुली केली. निफ्टी बँक निर्देशांकानेही दिवसाच्या नीचांकी स्तरावरून 1,000 अंकांची वाढ केली. The market made a smart recovery

सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी

सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी पाहावयास मिळाली. जागतिक बाजारातील सकारात्मकतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजाराची सुरुवात वरच्या स्तरावर झाली परंतु अजून एका अस्थिर सत्रात सुरुवातीचा नफा बाजाराने पुसत रेंजबाउंड कारभार केला.तथापी दुपारनंतर बाजाराला पुन्हा गती मिळाली आणि बाजार दिवसाच्या उच्च पातळीच्या जवळ बंद झाला.Market extends gains for 3rd day

सेन्सेक्स 376 अंकांनी वाढला

जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजाराची सुरुवात सकारात्मकतेने झाली संपूर्ण सत्र बाजाराने तेजी राखण्यात यश मिळवले. निफ्टीने 22000 चा टप्पा पार केला. ऑइल आणि गॅस तसेच पॉवर ही क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रांमध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजाराने वरचा टप्पा गाठला.ऑटो, आय.टी आणि फार्मा या क्षेत्राने या तेजीचे नेतृत्व केले.Sensex ends 376 pts up

(लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत)

jiteshsawant33@gmail.com

Nifty above 22,000 on the back of favorable macroeconomic data

ML/KA/PGB
17 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *