निफ्टी ५० ने प्रथमच ओलांडला २० हजारांचा टप्पा

 निफ्टी ५० ने प्रथमच ओलांडला २० हजारांचा टप्पा

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी उत्तम ठरला आहे. दिवसाचा व्यवहार संपण्यापूर्वीच प्रमुख निर्देशांक निफ्टी ५० ने इतिहास रचला आहे. या निर्देशांकाने प्रथमच २० हजारांची पातळी ओलांडली आहे.आज दुपारी निफ्टी निर्देशांकाने मागील सर्व विक्रम मोडून विक्रमी उच्चांक गाठला आणि २० हजारांचा टप्पा पार केला. जुलै २०२३ नंतर निफ्टीचा हा नवा विक्रमी उच्चांक आहे. यापूर्वी हा आकडा १९,९९५ होता. निफ्टी १८७.१० अंकांच्या वाढीसह २०,००७.०५ च्या पातळीवर व्यवहार करीत होता.
आज शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली असून, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक सकाळी ९.१५ वाजता १९,८९० च्या पातळीवर उघडला. बाजारातील व्यवहारात प्रगती होत असताना निफ्टीलाही गती मिळाली. ट्रेडिंगदरम्यान तो २०,००८.१५ च्या उच्च पातळीवर पोहोचला होता. निफ्टीने ही पातळी ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. निफ्टीने ३६ व्यापार सत्रांत पहिल्यांदाच ही विक्रमी पातळी गाठली आहे.

शेअर बाजारात आज सर्व क्षेत्र निर्देशांकांमध्ये वाढीचा कल कायम राहिला. धातू, ऑटो आणि ऊर्जा समभागांमध्ये वाढ झाली, तर बँकिंग, एफएमसीजी आणि आयटी समभागांनीही मोठी उसळी घेतली.निफ्टीबरोबरच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या ३० शेअर्सच्या सेन्सेक्सनेही दिवसभर झपाट्याने व्यवहार केले आणि शेवटी मजबूत वाढीसह बंद झाला.

SL/KA/SL

11 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *