भांडवली बाजाराची नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार.

 भांडवली बाजाराची नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार.

मुंबई , दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत

२०२२ या वर्षाची सुरुवात दमदार झाली.सलग तिसरा आठवडा तेजीचा होता. GST चे आकडे, India’s manufacturing PMI आकडे. वाहन विक्रीचे डिसेंबर मधील चांगले आकडे.तिसऱ्या तिमाहीत बँकांच्या क्रेडिट ग्रोथ मधील मजबुती, कपन्यांच्या निकाल चांगले येतील अशी आशा,जागतिक बाजारातील तेजी. व विशेष जमेची बाब म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांची(FII) पुन्हा एकदा सुरु झालेली खरेदी या जोरावर सेन्सेक्सने ६०,०० ची मनोवैज्ञानिक पातळी ओलांडली व निफ्टीने १८,००० च्या स्तराजवळ जाण्यात यश मिळवले.पण या स्तरावरून बाजार घसरला कोरोनाच्या नव्या वेरियंट ओमिक्रॉनचा वाढता प्रभाव तसेच अमेरिकन फेडने व्याजदर वाढविण्याचे दिलेले संकेत यामुळे बाजारात घसरण झाली.

येणाऱ्या आठवडयात गुंतवणूकदारांचे लक्ष दिग्गज IT कंपन्यांचे तिमाही निकाल तसेच विदेशी गुंतवणूकदारांचे((FII) खरेदी/विक्रीचे आकडे या कडे असेल.

मार्केटचा तांत्रिक दृष्ट्या ट्रेंड (technical trend) हा वरती जाण्याच्या (Bullish Trend /upward trend) आहे परंतु मार्केट हे ओव्हरबॉट असल्याने. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर उत्तम समभागात गुंतवणूक करावी.

सरकारने (Gross Domestic Product) जी.डी.पी बद्दल ऍडव्हान्स एस्टीमेट जाहीर केले व त्यात मार्च २०२२ चे आर्थिक वर्ष संपेपर्यंत जी.डी.पी मध्ये ९.२ % वाढ होईल असे सांगितले. India’s GDP may grow 9.2% in FY22: First advance estimates

बाजाराची २०२२ ची सुरुवात धमाकेदार. The market starts 2022 on a bullish note
नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार झाली.१२ वर्षातील सगळ्यात मोठी तेजी बाजाराने अनुभवली.काही आशियाई /युरोपियन बाजार बंद असून देखील भारतीय बाजारात तेजी होती.सेन्सेक्स १००० अंक तर निफ्टीत २७५ अंकांनी वाढ झाली. IT इंडेक्स विक्रमी स्तरावर पोहोचला. ऑटो/बँकिंग/मेटल क्षेत्रात तुफान तेजी होती.निफ्टीमधील ५० पैकी ४४ व सेन्सेक्स मधील ३० पैकी २५ समभागात तेजी होती.फार्मा वगळता बाकीची क्षेत्र तेजीत होती. डिसेंबर मधील चांगल्या विक्रीच्या आकड्यांमुळे ऑटो शेअर्स वधारले. सेमी कंडक्टरच्या सुरळीत झालेल्या सप्लाय मुळे पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटला आधार मिळाला. बाजारातील तेजीची प्रमुख कारणे, GST चे आकडे, India’s manufacturing PMI आकडे, Auto Stocks मधील खरेदी, ,सरकारने निर्बंध वाढवून मोठ्या प्रमाणात Lockdown न करणे. बाजार बंद होताना सेन्सेक्स ९२९ अंकांनी वधारून ५९,१८३ या स्तरावर बंद झाला व निफ्टीने २७१ अंकांनी वधारून १७,६२५ चा बंददिला.
बेरोजगारीचा दर .Unemployment Rate

डिसेंबर २०२१ मध्ये भारताचा बेरोजगारीचा दर (Unemployment Rate)चार महिन्याच्या उच्चतम पातळीवर पोहोचला. अशी माहिती सोमवारी ३ जानेवारी रोजी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) जाहीर केली.

सेन्सेक्स व निफ्टीत सलग तिसऱ्या दिवशी वाढ. Sensex, Nifty rise for 3rd day

सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजीचा माहोल होता. सुरुवातीच्या सपाट कारभारानंतर बाजाराने आपला मोर्चा पुन्हा एकदा तेजीकडे वळवला व कामकाज संपेपर्यंत तेजी टिकवली. Covid केसेस मध्ये वाढ होत असून सुद्धा नव्या विषाणूचा परिणाम घातक नसल्याने गुंतवणूकदारांची मानसिकता खरेदीची होती. power, oil व gas आणी banking या क्षेत्रातील खरेदीमुळे सेंसेक्सव निफ्टीत १% वाढ झाली.निफ्टीने १७,८०० चा टप्पा पार केला. CLSA ने Tata Motors कंपनीच्या शेअर्स मध्ये विक्री करण्याचा सल्ला दिल्याने टाटा मोटोर्स कंपनीचे शेअर्स घसरले. बाजार बंद होताना सेन्सेक्स ६७२ अंकांनी वधारून ५९,८५५ या स्तरावर बंद झाला व निफ्टीने १७९ अंकांनी वधारून १७,८०५ चा बंददिला.

सेन्सेक्सने ६०,००० चा स्तर पुन्हा गाठला.Sensex reclaims 60,000

सलग चवथ्या दिवशी बाजाराने तेजीचा अनुभव घेतला. निफ्टीने १८,००० च्या स्तराजवळ जाण्यात यश मिळवले तर सेन्सेक्सने आपली ६०,००० ची मनोवैज्ञानिक पातळी ओलांडली. तिसऱ्या तिमाहीत बँकांच्या क्रेडिट ग्रोथ मधील मजबुती, कपन्यांच्या निकाल चांगले येतील अशी आशा,जागतिक बाजारातील तेजी, आणि विदेशी गुंतवणूकदारांची(FII) पुन्हा एकदा सुरु झालेली खरेदी या जोरावर बाजाराला चांगलाच बूस्ट मिळाला. निर्देशांक त्यांच्या 20 डिसेंबरच्या नीचांकी पातळीपासून जवळपास 9 टक्के वाढले. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३६७ अंकांनी वधारून ६०,२२३ या स्तरावर बंद झाला व निफ्टीने १२० अंकांनी वधारून १७,९२५ चा बंददिला.

चार दिवसांच्या तेजीला लगाम. Bears halt 4-day rally

सलग चार दिवसांच्या तेजीला गुरुवारी चांगलाच लगाम लागला. कोरोनाच्या नव्या वेरियंट ओमिक्रॉनचा वाढता प्रभाव,जागतिक बाजारातील कमजोरी व अमेरिकन फेडचे व्याजदर वाढविण्याचे संकेत या कारणांमुळे बाजारात विक्रीचा सपाट होता.सेन्सेक्स ९०० अंकांनी गडगडला दिवसभरात काही प्रमाणात बाजाराने सावरण्याचा प्रयत्न केला. IT, Oil आणी Gas व real estate या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विक्री झाली.बाजार बंद होताना सेन्सेक्स ६२१ अंकांनी घसरून ५९,६०१ या स्तरावर बंद झाला व निफ्टीने १७९ अंकांनी घसरून १७,७४५ चा बंददिला. Sensex, Nifty Log Losses For The First Time In 2022.

निफ्टी १७,८०० च्या वरती बंद . Nifty ends above 17,800

आठवडयाच्या शेवटच्या दिवशी बाजाराने प्रचंड चढ उतार पहिले. सुरुवात गॅप अप ओपनिंगने झाली. परंतु दुपारनंतर बाजारात विक्रीचा मारा झाला व बाजार खाली घसरला.शेवटच्या तासाभरातील खरेदीमुळे बाजार सकारत्मक बंद देण्यात यशस्वी झाला. RIL आणि बँकिंग शेअर्स मुळे बाजार सावरला.बाजार बंद होताना सेन्सेक्स १४२ अंकांनी वधारून ५९,७४४ या स्तरावर बंद झाला व निफ्टीने ६६ अंकांची वाढ घेउन १७,८१२चा बंददिला.
(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.) jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB

8 Jan 2021

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *