आफ्रिकेतून भारतात पुन्हा येणार नवे पाहुणे

 आफ्रिकेतून भारतात पुन्हा येणार नवे पाहुणे

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नुकत्याच केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच आफ्रिकेतील नामिबियातून अजून १४ चित्ते भारतात दाखल होणार असल्याचे कळते आहे.
मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये यापूर्वी १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ५ मादी आणि ३ नर नामिबियातून भारतात आणण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांना कुनो येथे सोडण्यात आले होते. सध्या हे चित्ते भारतीय वातावरणाशी जुळवून घेत आहेत. हे चित्ते नामिबियाहून सुमारे आठ हजार किलोमीटरचा प्रवास करुन भारतात दाखल झाले आहेत.

1952 साली भारतातून चित्ते नामशेष झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली. भारतातून चित्ते नामशेष झाल्यानंतर 1970 साली देशात आणण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रयत्न सुरु केले होते.New visitors from Africa will come again to India

आता पुन्हा एकदा लवकरच नामीबियातून अजून १२ ते १४ चित्ते भारतात आणले जाणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत दिली आहे. भारत सरकारने नामिबिया सरकारसोबत तसा करारही केला आहे.

ML/KA/PGB
23 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *