खनिज आधारित उद्योगांसाठी नवे धोरण

 खनिज आधारित उद्योगांसाठी नवे धोरण

नागपूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खनिजावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी ऊर्जा आणि खाण धोरण आणलं जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी वर ते बोलत होते. नरेंद्र भोंडेकर यांनी ती उपस्थित केली होती.

हे धोरण अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याची घोषणा मुख्यमंत्री करतील असं ते म्हणाले. आधी गडचिरोली , मग चंद्रपूर , वर्धा आणि नागपूर या क्रमाने खाण उद्योगांना खनिज विकण्याची सक्ती केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. गडचिरोलीत आणखी चाळीस हजार कोटींची गुंतवणूक केली जाते आहे असे त्यांनी सांगितलं.

शेजारील राज्यांपैकी छत्तीसगड आणि मध्य प्रदेश यांचे वीजदर कमी असल्याने त्यासाठी हे नवे धोरण उपयोगी पडेल असं फडणवीस म्हणाले. हे धोरण तयार करताना कोकण आणि कोल्हापूर यांचाही विचार केला जाईल असं ते म्हणाले.

ML/KA/SL

28 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *