विदर्भ-मराठवाडा भागातील उद्योगांसाठी नवे ऊर्जा धोरण
नागपूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भ मराठवाडा भागातील उद्योगांना वीज सवलत देण्यासाठी नवीन धोरण तयार करण्यात येत असून राज्याच्या ३९,६०२ कोटींच्या ऊर्जा योजनेला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या विदर्भ मराठवाडा विकास चर्चेवर ते उत्तर देत होते.शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सरकारी जमिनिसोबात खासगी जमिनींना भाडे देऊन सौर ऊर्जा तयार करण्यात येईल. केवळ महाराष्ट्रासाठी केंद्राने बळीराजा संजीवनी योजना मंजूर केली असून त्यात विदर्भातील ६९ आणि मराठवाड्यातील १७ प्रकल्प आहेत असं फडणवीस म्हणाले.
विदर्भातील ८४,५८८ खाते धारकांच्या आठ लाखाहून अधिक हेक्टर जमिनींची मालकी घोषित करण्यात आली आहे, दूध संकलन २,१०,००० लिटर अधिक होऊ लागलं आहे, शेतकऱ्यांना ४८ रुपये लिटर इतका भाव मिळाला आहे, स्वाधार योजने अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना ओबीसी हॉस्टेल मध्ये जागा मिळणार नाही अशा हुशार विद्यार्थ्यांना थेट खात्यात पैसे जमा करण्याची योजना आखली आहे, आदिवासी विद्यार्थ्यांनाही फेलोशिप साठी मदत दिली जाणार आहे.
गोसीखुर्द चे लाभक्षेत्र एक लाख हेक्टर पर्यंत वाढवलं आहे, बेंबळा, लोअर वर्धा आदी सर्व योजनांना गती दिली आहे, आघाडी सरकारने अडीच वर्षात एकही सूप्रमा दिली नाही मात्र आम्ही ते सुरू केलं आहे असं फडणवीस यांनी सांगितलं.
ML/KA/SL
28 Dec. 2022