एन.डी.स्टुडिओमध्ये २५ डिसेंबरपासून कार्निवल रंगणार

 एन.डी.स्टुडिओमध्ये २५ डिसेंबरपासून कार्निवल रंगणार

मुंबई, दि २४:* महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत कर्जत-खालापूर येथील एन. डी. स्टुडिओ येथे सकाळी १० ते ६ पर्यंत कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्निवलमध्ये खेळ, मनोरंजनासह सेलिब्रेटीसोबत गप्पाचा कार्यक्रम नियमितपणे संपन्न होणार आहे. त्यामुळे वर्षाखेरीस कौटुंबिक पर्यटनाचा आनंद लूटता येणार आहे.

पाच वर्षापासून सर्व वयोगटासाठी केवळ १४९९ रुपये कार्निवलचे तिकीट असून, एकाचवेळी २५ आणि त्यापेक्षा जास्त बुकिंग केल्यास १३९९ रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. तिकीट बुकिंग ऑनलाइन www.ndartworld या संकेतस्थळावर व स्टुडिओच्या ठिकाणी ऑफलाईन उपलब्ध आहे. या कार्निवलला
पर्यटकांनी भेट द्यावी, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केले आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *