नवाब मलिकांच्या जामिनास नकार

 नवाब मलिकांच्या जामिनास नकार

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वैद्यकीय जामिनासाठी केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. त्याचवेळी मलिक यांच्या वैद्यकीय स्थितीचा दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचेही आदेश ही न्यायालयाने दिले.Nawab Malik’s bail denied

मलिक हे त्यांच्या पसंतीनुसार खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. Malik is undergoing treatment at a private hospital of his choice. तर दुसरीकडे अनेक कैद्यांना अशी सुविधा मिळत नाही याचाही विचार करायला हवा, असेही न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठाने मलिक यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देताना म्हटले. तसेच वैद्यकीय गरज भासल्यास मलिक हे सुट्टीकालीन न्यायालयाकडे दाद मागू शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. मलिक यांनी नियमित जामीनाचीही मागणी केली आहे. त्यावरील सुनावणी न्यायालयाने ६ जानेवारी रोजी ठेवली आहे. विशेष न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्यावर मलिक यांनी वैद्यकीय जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

ML/KA/PGB
13 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *