नवनीत राणाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.

 नवनीत राणाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी Navneet Rana’s application was rejected by the court.खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांनी दाखल केलेला दोष मुक्ततेसाठी अर्ज न्यायालयाने आज फेटाळला.

जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात 2014 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खासदार नवनीत राणा यांनी शिवडी न्यायालयाच्या आदेशाला मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. शिवडी न्यायालयानंही नवनीत राणा यांचा दोषमुक्तीसाठीचा अर्ज यापूर्वी फेटाळला होता.

शिवडी न्यायालयाचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आला आहे. तसेच शिवडी न्यायालयाने जारी केललं अजामीनपात्र वॉरंटही योग्य असल्याचं सांगत सत्र न्यायालयाने त्या वॉरंटला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला आहे.

ML/KA/PGB
21 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *