मुंबईतल्या मलबार हिलमध्ये ‘नेचर वॉक’ घेता येणार, सर्वांसाठी खुला

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी ३१ मार्चला मुंबईतला पहिला एलिवेटेड नेचर ट्रेल वॉकवे मलबार हिल येथे सुरू करण्यात आला. सर्वसामान्यांसाठी हा वॉकवे उघडला असून यासाठी शुल्क आकारले जाणार आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या या लाकडी पुलाचा रस्ता ४५८ मीटर लांब असून रुंदी अडीच मीटर इतकी आहे. या वॉकवेतून मुंबईतल्या जैवविविधतेचं दर्शन होणार आहे. येथून तुम्हाला १०० पेक्षा जास्त वनस्पती, वेगवेगळे पक्षी पाहता येतील. याशिवाय समुद्राचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी सी व्हिविंग डेकही या ठिकाणी असणार आहे.