नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
लागणारे जिन्नस:
साहित्यः
दुध – १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम – १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) – १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प – १ वाटी/कप,
साखर – चवीनुसार,
क्रमवार पाककृती:
वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते. Naturals Ice Cream now at home
PGB/ML/PGB
26 Nov 2026