जागावाटपासाठी महाविकास आघाडीची पुढील आठवड्यात बैठक

 जागावाटपासाठी महाविकास आघाडीची पुढील आठवड्यात बैठक

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा करण्यासाठी पुढच्या आठवड्यात ७ आँगस्ट रोजी महाविकास आघाडीची बैठक होईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा अद्याप झालेली नसल्याने कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. ४ आँगस्ट रोजी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला मुंबईत येत आहेत. जागा वाटपासाठी गठीत केलेल्या समितीच्या काँग्रेस नेत्यांशी आधी चर्चा होईल. त्यानंतर ७ तारखेला महाविकास आघाडीची बैठक होईल, त्या बैठकीत जागा वाटपाची चर्चा होईल, अशी माहिती पटोले यांनी दिली.

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असून आपलीही उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा झाली आहे असेही नाना पटोले यांनी सांगितले.

दरम्यान, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उपवर्गीकरण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागतच आहे. परंतु सरकार या निर्णयाची अंमलबजावणी करेल की नाही याबाबत शंका असल्याचही पटोले म्हणाले. दरम्यान, भाजप सरकार एससी, एसटींना ओबीसीप्रमाणे क्रीमी लेअरची मर्यादा घालून आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही नाना पटोले यांनी केला.

ML/ML/PGB
1 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *