महापालिकेत अण्णा भाऊ साठे जयंती साजरी
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महापौर दालनातील अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (अतिरिक्त कार्यभार) संजोग कबरे यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आज पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी महानगरपालिका सचिव (प्रभारी) श्रीमती शुभांगी सावंत यावेळी उपस्थित होत्या.
तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०४ व्या पुण्यतिथीनिमित्त स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यास माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे, महानगरपालिका सचिव (प्रभारी) श्रीमती शुभांगी सावंत, लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समिती कार्यकारी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश सिलम, सचिव सुरेंद्र शंकरशेट यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
SW/ML/PGB
1 Aug 2024