नागपूर ,अजनी रेल्वे स्थानके होणार पुनर्विकसित
नागपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रेल्वे प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याचा उद्देशाने मध्य रेल्वे तर्फे नागपूर आणि अजनी रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्याला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे .
या दोन्ही स्टेशनचा मास्टर प्लान तयार करण्यात आला असून नागपूर स्थानकावर 488 कोटी रुपये खर्च करून केवळ 36 महिन्यात पुनर्विकासाचे कार्य पूर्णत्वास येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे चे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी नागपूरात दिली . ते आज नागपूर विभागातील इटारसी-बैतुल-आमला-परासिया विभागाची वार्षिक तपासणी करण्यासाठी आल्यानंतर नागपूर विभागीय मंडळ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते .Nagpur, Ajni railway stations will be redeveloped
याशिवाय नागपूरातीलच अजनी रेल्वे स्थानकाचाही पुनर्विकासाचा अंतिम आराखड्याला मंजुरी मिळाली असून अजनी रेल्वे वर 298 कोटी रु खर्च होणार आहे . त्याचे कार्यही केवळ 40 महिन्यात पूर्ण केले जाणार असून नागपूर आणि अजनी स्थानकाला महा मेट्रो शी जोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .
महाव्यवस्थापकांनी सहेलि आणि काळा आखर स्थानकांदरम्यान असलेल्या सहेलि पुलाची पाहणी करून सुरुवात केली आणि त्यानंतर काळा आखर- घोराडोंग्री विभागावर ताशी 130 किमी वेगाने धाव घेतली. घोराडोंग्री स्थानकावर, महाव्यवस्थापकांनी परिभ्रमण क्षेत्र, पॅनेल/रिले कक्ष, सोलर प्लांट, रेल्वे कॉलनी आणि उद्यानाची पाहणी केली. त्यांनी लेव्हल क्रॉसिंग गेटची पाहणी केली.
धराखोह येथील कॅच साईडिंग तपासणी त्यानंतर बोगदा, व्हायाडक्टची पाहणी केली आणि धाराखोह-मरामझिरी विभागावरील ट्रॅक मेंटेनरच्या गँग युनिटशी संवाद साधला. मरामझिरी-बैतूल विभागावरील पुलाखालील रस्त्याचीही त्यांनी पाहणी केली.
बैतूल स्टेशनवर लाहोटी यांनी व्यावसायिक, लेखा, वैद्यकीय, आरपीएफ आणि राजभाषा विभागांद्वारे प्रदर्शित केलेल्या विविध स्टॉलची पाहणी केली. त्यांनी स्टेशनवरील प्रदक्षिणा क्षेत्र, पॅनेल रूम, बुकिंग ऑफिस कॉन्कोर्स आणि वेटिंग रूमची पाहणी केली. त्यानंतर गुड्स शेड, ट्रॅक मशीन साईडिंग, आरपीएफ कार्यालय आणि स्क्रॅप लॉटची तपासणी केली.
ML/KA/PGB
26 Nov .2022