नगर – बीड – परळी मार्गावर रेल्वेची चाचणी यशस्वी

 नगर – बीड – परळी मार्गावर रेल्वेची चाचणी यशस्वी

बीड, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नगर – बीड – परळी रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत अंमळनेर ते विघणवाडी दरम्यान रेल्वे चाचणी यशस्वीरित्या पार पडली.  30 किलोमीटर अंतराची चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. लवकरच नगर ते बीड पर्यंत लोहमार्ग चे काम पूर्ण होणार असून त्यामुळे मराठवाड्यातील प्रवास सोपा व सुखकर होणार आहे. मराठवाड्यातील नागरिकांची प्रतीक्षा आता संपणार आहे.

या सर्व लोहमार्गामध्ये डिझेल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. गेल्या सात वर्षांपासून या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे, यापूर्वी नगर ते नारायणडोह, नारायणडोहा ते सोलापूर वाडी, सोलापूरवाडी ते अंमळनेर या मार्गाची चाचणी घेण्यात आली . आज 30 किलोमीटर रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली.
आता एकूण 95 किलोमीटर अंतराची चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच या महत्त्वकांक्षी  रेल्वे मार्गावर अनेक मोठे पूल बांधण्यात आले.त्यासाठी मोठे तांत्रिक कौशल्य वापरून दक्षिण रेल्वे वरील सर्वात मोठा गल्डर टाकून रेल्वे रूळ अंथरण्यात आले आहेत.

500 मीटर लांबीचे आणि 18 मीटर उंचीचे नऊ  मोठे पूल बांधण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे गाड्या धावण्यासाठी लोहमार्गाला बळकटी मिळणार आहे.
रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्रशासकीय अधिकारी ए के पांडे, मुख्य अभियंता राजकुमार वानखेडे, उप मुख्य अभियंता राकेश कुमार यादव, सहाय्यक कार्यकारी अभियंता एस सुरेश,
कार्यकारी अभियंता अवधेश मीना आदी यावेळी उपस्थित होते.

ML/ML/PGB
9 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *