नागपंचमीला झाले दीड दिवसाच्या गणपतीचे आगमन….
अमरावती दि १०– अमरावती जिल्ह्य़ातील भातकुली तालुक्यातील धामोरी गावात दीड दिवसाच्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून नागपंचमीला दीड दिवसाच्या गणपतीला बसविण्याची परंपरा धामोरी गावात सुरू आहे..
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या बाप्पाचे आगमन होण्यासाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. मात्र धामोरी गावात नागपंचमीनंतर लगेच बाप्पाचा आगमन होतं.
बाप्पाच्या आगमनासाठी धामोरी गावातील सर्व जाती धर्मीय लोक मोठय़ा गुण्यागोविंदाने एकत्र येतात.. मोठ्या उत्साहात थाटात वाजत गाजत बाप्पाचा आगमन होत मिरवणूक काढण्यात येते.
धामोरी गावात काल नवसाला पावणार्या बाप्पाची दीड दिवस पूजा अर्चना करून विसर्जन ही करण्यात आले.