मेरी मिट्टी , मेरा देश कार्यक्रम भगुरमध्ये साजरा

 मेरी मिट्टी , मेरा देश कार्यक्रम भगुरमध्ये साजरा

नाशिक, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या भगूर येथे मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रमाचे आयोजन काल शहरातून मशाल रॅली काढून करण्यात आले , त्यात भगूरकरांचा या उपक्रमात मोठा सहभाग होता.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश अभियानात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे भगूर नगरपालिकेच्या वतीने आयोजित मशाल रॅली काढून स्वातंत्र्य युद्धात सहभागी झालेल्या क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आले. भगूर येथील छत्रपती शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला भगूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मशाल रॅलीचा प्रारंभ करण्यात आला.

या रॅलीमध्ये भगूरकर नागरिकांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता हातात तिरंगा ध्वज घेऊन रॅलीतील महिलांनी भारत माता की जय वंदे मातरम चा घोषणा देण्यात आल्या. भगूर शहरातील प्रमुख मार्गावरून ही मशाल रॅली मार्गस्थ झाली. रॅलीचा समारोप सावरकरांचे जन्मस्थान असणाऱ्या सावरकर वाड्यातील सावरकर स्मारकामध्ये झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार सावरकर स्मारकांमध्ये भव्य मातीच्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती तसेच महिलांनी आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या.

भगूर येथील सावरकर स्मारकात मान्यवरांच्या हस्ते स्मारकातील सावरकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महिलांनी शेकडो मातीचे दिवे प्रज्वलित केले तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारत मातेच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या राष्ट्रगीताने या मशाल रॅलीचा शुभारंभ आणि समारोप राष्ट्रगीत गायनाने झाला मशाल रॅलीमध्ये भगूरकर नागरिक विशेषता महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.

ML/KA/SL

11 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *