न्युमोनिया आजारास प्रतिबंध करण्यासाठी पालिकेचे विशेष अभियान
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात ५ वर्षाखालील बालमृत्यू दर हा दर हजारी जिवंत बालकांच्या पाठीमागे ७४ वरुन ३७ वर आलेला आहे, असे असले तरीही परिणामकारक उपचार व लस उपलब्ध असूनही बालकांमध्ये होणा-या न्युमोनिया ह्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या गंभीर आजाराची व्याप्ती लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने SAANS Initiative अंतर्गत न्युमोनिया पासून बचाव, प्रतिबंध व उपचार करण्यासाठी मार्गदर्शक सूचना विकसित केल्या आहेत.Municipal special campaign to prevent pneumonia
केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या निर्देशांन्वये मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने १२ नोव्हेंबर २२ ते २८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत SAANS उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे प्रमुख ध्येय सन २०२५ पर्यंत भारतात बालकांमधील न्युमोनियामुळे होणा-या बालमृत्यूचे प्रमाण दर हजारी जिवंत बालकांमध्ये ३ पेक्षा कमी करणे हे आहे.
खोकला आणि सर्दी वाढणे, श्वासोच्छवास वेगाने होणे, श्वास घेताना छाती आत ओढली जाणे, ताप येणे इत्यादी लक्षणे लहान बालकांत आढळून आल्यास पालकांनी अधिक उपचारासाठी जवळच्या आरोग्य केंद्र, दवाखाना, प्रसुतिगृह व रुग्णालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे यांनी केले आहे.
ML/KA/PGB
22 Nov .2022