खासदार गिरीश बापट यांचे निधन
पुणे, दि २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजारामुळे आज निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.
पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना आय सी यु मध्ये लाईफ सपोर्ट वर त्यांना ठेवण्यात आले होते. डॉक्टरांची एक टीम गिरीश बापट यांच्या तब्येतीकडे बारीक लक्ष देऊन होती अशी माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे माहिती अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली आहे.
कसबा पोटनिवडणुकीच्या वेळी गिरीश बापट मतदानासाठी आले तेव्हा देखील त्यांची तब्येत खालावलेली पाहायला मिळत होती. व्हीलचेअर वर बसून ते मतदान करण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयात उपचार सुरू होते .
त्यांनी सलग पाच वेळा पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते, २०१४ ते २०१९ या काळात ते राज्याचे अन्न नागरी पुरवठा, अन्न औषध प्रशासन आणि विधानकार्य मंत्री होते , २९१९ मध्ये ते पुण्यातून लोकसभेवर निवडून गेले होते.
गिरिश बापट यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी शासकीय इमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित होते
ML/KA/SL
29 March 2023